Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

रूबी हॉल क्लिनिक च्या सायबर नाईफ सेवेची इंद्रेश कुमार यांच्या कडून पाहणी

 

पुणे: रूबी हॉल क्लिनिकला भेट देवून च्या सायबर नाईफ सेवेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी पाहणी केली आणि प्रशंसा केली. विना शस्त्रक्रिया कर्करोग वर उपचार करण्याच्या आधुनिक तंत्राची प्रशंसा केली. कर्करोग झालेल्या रूग्णांना बरे करुन मानवतेचे कार्य करावे, दिलासा द्यावा आणि आधुनिक तंत्राचा लाभ द्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रिय अल्पसंख्यक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, रुबी हॉल क्लिनिक चे प्रमुख डॉ परवेझ ग्रँट, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाईजी उपस्थित होते. क्लिनिक च्या वतीने इंद्रेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला.

इंद्रेशकुमार यांनी यावेळी वाहिन्यांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीच्या पार्श्वभूमीवर सनातन धर्म, समान नागरी कायदा,वन नेशन -वन इलेक्शन , संसदेचे विशेष अधिवेशन या विषयावर मते व्यक्त केली

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading