Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांच्या फूड फेस्टिव्हलचे उत्साहात उद्घाटन

 

पुणे : आत्मनिर्भर भारत व कौशल्य विकास उपक्रमांतर्गत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी तयार केलेल्या खाद्य पदार्थ व कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. मॉडेल कॉलनी येथील महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र येथे हॉटेल जे.डब्ल्यू. मॅरिएटचे एक्झिक्युटिव्ह सु शेफ नितीन शितोळे, समीर तेंडुलकर व केटरिंग सेल्स विभागाच्या संचालक लीना बोस यांच्या शुभहस्ते या फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले.
ट्रॅडिशनल स्नॅक्स अँड सेव्हरी मेकर, स्ट्रीट फूड व्हेंडर व क्राफ्ट बेकर असे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री या फूड फेस्टिव्हल मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
पंचवीस प्रकारचे मोदक, चकली, विविध प्रकारचे लाडू, करंजी, विविध प्रकारच्या पुरणपोळ्या, बेकरी पदार्थ तसेच संस्थेच्याच फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेले फॅशनेबल ड्रेसेस, डिझायनर ब्लाउज अशा विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यानी तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांच्या चवीचे परीक्षण करीत नितीन शितोळे व समीर तेंडुलकर यांनी मोलाच्या टिप्स देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच पदार्थांची चव व पौष्टिकता सांभाळतानाच त्याची बाह्य मांडणी आकर्षक कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या मुंबईच्या ट्रायडन्ट हॉटेलच्या सु शेफ स्वराली धुमाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांचे अभिनंदन केले.
कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्त्याही विद्यार्थी- विद्यार्थिनींना विक्री कौशल्य, मार्केटिंग, सजावट याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा,जेणेकरून त्यांची उद्योजकीय वाटचाल सोपी होईल या हेतूने या फूड फेस्टिव्हल व फ्ली मार्केट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी दिली. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून १७ सप्टेंबर पर्यंत (रविवारी) सकाळी करा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सुरु राहणार आहे. या फूड फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे, ईशा फाटक, प्रसाद शाळीग्राम, प्रसाद महाडिक,स्वाती घाडगे व शुभांगी कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading