Wednesday, June 24, 2026
ENTERTAINMENTLatest News

श्री गणेशाच्या स्वागतासाठी नवीन गीत “गणराज आले”

गणेश उत्सव म्हटलं की सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक जण मनोभावे आपापल्या परीने तयारी ला लागतात. यावर्षी “भादव्याचा सण आला सांगतात ढोल, गणराज आले सांगतात ढोल” हे नवेकोरे गाणे लवकरच भक्तांच्या भेटीला येत आहे. या गाण्यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणित होणार असून हे गीत यंदा गणेशोत्सव गाजवणार असल्याचे मत या गीताचे दिग्दर्शक प्रशांत पांडेकर यांनी व्यक्त केले.

डॉ. संगीता गोडबोले या गीत लेखिकेने हे गाणे अतिशय तरल व समर्पक शब्दात शब्दबद्ध केले असून या गाण्याला संज्योती जगदाळे व संदीप उबाळे यांनी स्वरबद्ध केले आहे. गाण्याचे संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे असून या व्हिडीओ गाण्याचे दिगदर्शन “मायबापा विठ्ठला” फेम प्रशांत पांडेकर यांनी केले आहे. संगिता तिवारी यांनी कला, दिग्दर्शनासहित अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून संकलन आशय देशपांडे, छायांकन चेतन साळुंके, निर्मिती व्यवस्थापन सचिन वाडकर, यांनी केली आहे. या गाण्यामध्ये अक्षय वाघमारे व स्वतः अभिनेत्री, निर्माती शिल्पा ठाकरे यांनी कलाकार म्हणुन काम केले आहे.

मी अनेक चित्रपट आणि अल्बम मधुन काम केले आहे. परंतु श्री. गणेश चरणी ही माझी 21 दुर्वांची जुडी असून बाप्पा वरचे गाणे करून मला अतिशय आनंद होत आहे. या गाण्यासाठी सगळ्यांनी मला चांगली साथ दिली. हे गाणे गणेश भक्तांना निश्चित आवडेल असे निर्माती शिल्पा ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading