fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsLIFESTYLE

कंट्री क्लब मिसेस पुणे २०२३ च्या मिसेस सुनीता खान विजेत्या


कंट्री क्लब उंड्री पुणे तर्फे त्याच्या बहुचर्चित उपक्रम कंट्री क्लब मिसेस पुणे २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कंट्री क्लब उंड्रीद्वारे आयोजित हा कार्यक्रम जॅझमॅटाझवर्ल्ड (Jazzmatazzworld ) यांच्या सहयोगाने पार पडला. जॅझमॅटाझवर्ल्ड( Jazzmatazzworld) ही एंटरटेनमेंट व्यवसायात ३१ वर्षांपासून कार्यरत असलेली अनुभवी कंपनी आहे.
या स्पर्धेचे विजेते खालिलप्रमाणे
• १ रनर अप :- डॉ.ज्योती बोरसे
• २ रनर अप :- राधिका राठोड
• मिसेस गॉजियेस :- सीमा रॉय
• मिसेस पॉप्युलर:- अर्मीन इराणी
• मिसेस पोटोजनीक :- अश्विनी लोंढे
• मिसेस टॅलेंटेड:- ममता बोट
• मिसेस परफेक्ट :- लक्ष्मी
• मिसेस पुणे क्लासिक :- प्राची दासवाणी
कंट्री क्लब मिसेस पुणे २०२३ चा हा १७ वा हंगाम असून वर्षातील सर्वात आकर्षक कार्यक्रम म्हणून हा उपक्रम नावारूपास आला. कंट्री क्लब या उपक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर होते. शोच्या संचालिका, दिपाली खमर यांचास्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचा वाटा आहे.
कंट्री क्लबचा फॅशन उद्योगात समृद्ध इतिहास आहे, माननीय अध्यक्ष आणि एम डी , श्री वाय राजीव रेड्डी यांनी यापूर्वी अनुक्रमे मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड म्हणून त्यांच्या विजयी कारकिर्दी दरम्यान अभिनेत्री सुष्मिता सेन आणि युक्ता मुखी यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव केला आहे.
फॅशन शिवाय, कंट्री क्लब युवामध्ये क्रीडा, आरोग्य आणि तंदुरुस्तीचा प्रचार करण्यात अग्रेसर आहे, अनेक दिग्गज व्यक्ती श्री कपिल देव, श्री सुनील गावसकर, श्री सय्यद किरमाणी, आणि श्री रॉजर बिन्नी त्याच्या सदस्यांमध्ये खिलाडूवृत्ती आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी क्लब सोबत सहभागी होत आहेत. याव्यतिरिक्त, सानिया मिर्झा, पी.व्ही. सिंधू आणि श्री. अझरुद्दीन यांसारख्या प्रतिष्ठित खेळाडूंनी, क्रीडा जगतात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि ते कंट्री क्लब कुटुंबाचे अभिमानास्पद सदस्य आहेत.
विशेष म्हणजे, कंट्री क्लब बॉक्सिंग दिग्गज, मेरी कोम, तसेच भारत रत्न व पद्मश्री पुरस्कार विजेते व निखत झरीन सारखे खेळवू यांना सोबत घेऊन क्रीडा व फिटनेस चा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करतात.
यावेळी बोलताना कंट्री क्लबचे अध्यक्ष आणि एमडी श्री वाय राजीव रेड्डी म्हणाले की, “शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढवून एकंदर व्यक्तिमत्वाच्या विकासात मनोरंजन आणि फॅशन महत्त्वाची भूमिका बजावतात जे एक मजबूत आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी कोविड नंतर खूप महत्वाचे आहे. फॅशन इंडस्ट्रीचे भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धा जिंकून हरनाज कौर संधू यांनी आपल्या देशाला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे.”
कंट्री क्लब बद्दल थोडेसे:
कंट्री क्लब हे एम. आय. सी. ई आणि क्लबिंग अनुभवांच्या क्षेत्रातील एक ट्रेलब्लेझर आहे, जे त्याच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्या सदस्यांमध्ये क्रीडा, आरोग्य आणि फिटनेस यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. फॅशन आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधील प्रमुख व्यक्तींच्या सहवासाच्या समृद्ध इतिहासासह, कंट्री क्लब हे उत्कृष्टतेचे समानार्थी नाव आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: