वात्सल्यमूर्ती मीनाताई ठाकरे सर्व शिवसैनिकांची मायेची सावली; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून अभिवादन.
मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथे जाऊन मीनाताईंच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यादरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
माँसाहेबांना अभिमान वाटावा अशा प्रकारचे काम महिला शिवसैनिक करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अनेक विकासात्मक योजना राबवित असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसेना महिला सेनेच्या वतीने आज माँसाहेबांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शीतल म्हात्रे, कला शिंदे, तृष्णा विश्वासराव माजी नगरसेविका प्रतिक्षानगर वडाळा , रिदन फर्नांडो उपविभाग प्रमुख धारावी, प्रविण जैन विधानसभा संघटक धारावी, तेजस नारकर शाखाप्रमुख सायन, गिरीश धानोरकर विभागप्रमुख माहीम, कुणाल वाडेकर विधानसभा संघटक माहीम, अभिजित राणे शाखाप्रमुख दादर यांसह शिवसैनिक उपस्थित होते.