Wednesday, May 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘ते’ 100 बिलियन डॉलर कुणाचे? राहूल गांधी यांचा थेट मोदींना सवाल

मुंबई : अमेरिकन संस्था ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (ओसीसीआरपी) भारतातील अदानी ग्रुपला लक्ष्य केले असून अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले असून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, त्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

खासदार राहुल गांधी म्हणाले की, विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड असून ते गौतम अदानी यांचे बंधू आहेत. अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीचा पैसा कसा? अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चीनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे, याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधींनी केलेले हे सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले आहेत. त्यांनी या संबंधित एक निवेदन प्रसिद्ध करुन हे आरोप जुनेच असून त्यामध्ये समूहाला क्लीन चिट मिळाल्याचे म्हटले आहे. हिंडनबर्ग नंतर आता ओसीसीआरपी या अमेरिकन संस्थेने भारतातील अदानी ग्रुपला लक्ष्य केले आहे. अदानी समुहाने आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा ओसीसीआरपी चा आरोप आहे.

राहुल गांधी म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीत काही लोकांनी छुपी गुंतवणूक केली आहे. जवळपास १ अब्ज डॉलर्स हे अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशात गेले आणि नंतर ते परत आले आहेत. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? असा सवाल त्यांनी केला आहे.

अदानी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. तसेच ईडी, सीबीआय हे अदानी यांची चौकशी का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading