PMP : ४ बसमार्गांचा विस्तार, १ बसमार्ग पूर्ववत, २ बसमार्गांवर विना वाहक जलद बससेवा व ३ नवीन बसमार्ग
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार गर्दीच्या वेळेमध्ये फेऱ्या देऊन ४ बसमार्गांचा विस्तार, १ बसमार्ग पूर्ववत सुरू, २ मार्गांवर विना वाहक जलद बससेवा व ३ बसमार्गांवर नव्याने बससेवा सुरू करण्यात येत आहे. हे सर्व बसमार्ग दिनांक ०१/०९/२०२३ पासुन प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात येत आहे.
सदरील बस मार्गांचा तपशील खालील प्रमाणे
अ.क्र. मार्ग क्र. पासुन-पर्यंत मार्गाचा तपशील वारंवारीता
४ विस्तारीत बसमार्ग
१ के-७ दांगट इस्टेट ते गालिंदे पथ या मार्गाचा विस्तार डेक्कन जिमखाना पर्यंत वारजेगांव, कर्वेनगर,कर्वेपुतळा, एसएनडीटी कॉलेज १ तास १० मि.
२ ३५ अ सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज ताथवडे या मार्गाचा विस्तार म.न.पा. भवन पर्यंत सिमला ऑफिस, पुणे विद्यापीठ, औंधगांव, डांगे चौक ५० मि.
३ २१६ भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा या मार्गाचा विस्तार शिवाजीनगर पर्यंत स्वारगेट, शनिपार, म.न.पा. भवन ३० मि.
४ ३५६ देहुगांव ते मोशी या मार्गाचा विस्तार भोसरी मोशीगांव, मोईफाटा, चिखली, तळवडे १ तास ४५ मि.
१ बसमार्ग पूर्ववत
१ १०८ सुतारदरा ते पुणे स्टेशन शिवतीर्थनगर, डेक्कन कॉर्नर, अ.ब.चौक, फडके हौद १ तास ४५ मि.
विना वाहक जलद २ बसमार्ग
१ १२१ क भोसरी ते म.न.पा. भवन जलद बससेवा (विनावाहक) लांडेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी, वाकडेवाडी १ तास १५ मि.
२ ३०१ क स्वारगेट ते हडपसर जलद बससेवा (विनावाहक) पुलगेट, रामटेकडी, मगरपट्टा दवाखाना ४५ मि.
३ नवीन बसमार्ग
१ १९६ स्वारगेट ते जगदंबा भवन, पिसोळी मुकूंदनगर, मार्केटयार्ड डेपो, कोंढवा, खडीमशीन २ तास २० मि.
२ ३३२ निगडी ते जांबे आकुर्डी रेल्वे स्टेशन, वाल्हेकरवाडी, पुनावळे १ तास
३ मेट्रो शटल क्र.३७ पिंपरी मेट्रो स्टेशन ते किवळेगांव मार्गे चिंचवडगांव, धर्मराज चौक, इस्कॉन मंदिर, शिंदे
वस्ती, आर्दशनगर, मुकाई चौक २ तास
तरी सदरच्या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.
