मंजरी फडणीस म्हणाल्या, ”मला मृणाल कामतबाबत जाणून घेण्यासाठी खूप संशोधन करावे लागले”
उत्खनन मोहिमेवर असलेला माणूस, सीरियाच्या युद्धग्रस्त प्रतिकूल वातावरणात बंदिवान असलेली तरुण मुलगी, ती या मृत्यूच्या संकटामधून कशी सुटणार? डिस्नी+ हॉटस्टार वर्षातील सर्वात मोठी एक्सट्रॅक्शन सिरीज ‘द फ्रीलांसर’ रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. ही सिरीज शिरीष थोरात लिखित – ए तिकीट टू सीरिया या पुस्तकावर आधारित आहे, भाव धुलिया दिग्दर्शित, फ्रायडे स्टोरीटेलर्स निर्मित या सिरीजचे निर्माते व शोरनर नीरज पांडे आहेत. डिस्नी+ हॉटस्टारवर १ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होण्यास सज्ज असलेली सिरीज ‘द फ्रीलान्सर’मध्ये लोकप्रिय अभिनेता मोहित रैना, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि कश्मिरा परदेशी प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच या सिरीजमध्ये सुशांत सिंग, जॉन कोक्कन, गौरी बालाजी व नवनीत मलिक, मंजरी फडणीस, सारा जेन डायस हे प्रतिभावान कलाकार देखील आहेत.
कलाकारांचे काम सोपे नसते आणि विशेष प्रशिक्षण, संशोधन, सराव, तालीमेची गरज असलेल्या भूमिकांसह त्यांचे काम अधिक आव्हानात्मक होऊन जाते. मंजरी फडणीस सिरीज ‘द फ्रीलांसर’मध्ये मृणाल कामतची भूमिका साकारण्यासाठी केलेल्या तयारीबाबत सांगत आहे.
भूमिकेसाठी केलेल्या तयारीबाबत सांगताना मंजरी फडणीस म्हणाल्या, ”मृणालची भूमिका साकारण्यासाठी तयारी करण्याचा प्रवास माझ्यासाठी अत्यंत रोचक होता. मी साकारणाऱ्या कोणत्याही भूमिकेसाठी नेहमीप्रमाणे काम करण्यासोबत मला या भूमिकेसाठी काही संशोधन करावे लागले, कारण मृणाल मानसिक आजारासाठी काही वर्षांपासून उपचार घेत आहे. मी डिसोसिएटिव्ह डिसऑर्डरबद्दल थोडे संशोधन केले आणि त्याचा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर, तसेच एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या आघातांचा कसा परिणाम होतो याचा देखील अभ्यास केला. या संशोधनामुळे मला भूमिका सामना करत असलेली भावनिक स्थिती समजण्यास मदत झाली.”
आलियाला वाचवण्यासाठी ‘द फ्रीलांसर’चे मिशन पहा १ सप्टेंबर २०२३ पासून फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर