Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PMP : खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप मागे

पुणे : ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला. कोथरूड डेपोकडील कंत्राटी चालकांनी शनिवार दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी संप मागे घेतला तर पुणे स्टेशन व वाघोली डेपोकडील कंत्राटी चालकांनी रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारनंतर संप मागे घेतला. खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीएमएल च्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली होती.
ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल च्या बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे खालील तपशीलावरून दिसून येते.

संपापूर्वीची दिनांक १८, १९ व २० ऑगस्ट २०२३ रोजीची आकडेवारी खालीलप्रमाणे
अ.क्र. दिनांक वार मार्गावरील बसेसची संख्या प्रवाशी संख्या उत्पन्न
१ १८/०८/२०२३ शुक्रवार १७०१ १३,१८,७३७ १,८७,९०,०४७
२ १९/०८/२०२३ शनिवार १६८३ १२,५४,६५० १,७७,४७,३२४
३ २०/०८/२०२३ रविवार १५९५ १०,७९,९१० १,५२,६२,७४७
संपकाळातील दिनांक २५, २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजीची आकडेवारी खालीलप्रमाणे
अ.क्र. दिनांक वार मार्गावरील बसेसची संख्या प्रवाशी संख्या उत्पन्न
१ २५/०८/२०२३ शुक्रवार १६०२ १३,००,७४९ १,७८,२४,२२०
२ २६/०८/२०२३ शनिवार १५८९ १२,५३,१६९ १,७०,९०,३५६
३ २७/०८/२०२३ रविवार १६१७ ११,३३,७६७ १,५३,२९,२९२
दरम्यान रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारपासूनच पीएमपीएमएलची बससेवा पूर्वपदावर आलेली आहे. तसेच
सोमवार, दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी एकूण १८०१ बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध करून
देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading