Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाने २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या चौथ्या फेरीत मिळवले २ पॉइंट्स

मंदालिका इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किट (इंडोनेशिया) :– २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) चौथ्या फेरीच्या दुसऱ्या रेसमध्ये इदेमित्सु होंडा इंडिया रेसिंग टीमने मंदालिका इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किट (इंडोनेशिया) येथे दोन पॉइंट्स मिळवत या फेरीची सांगता केली.

सोलो भारतीय रायडर कविन समार क्विंतल यांनी आपला खेळ उंचावत आजच्या अंतिम रेसमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या रेसमध्ये त्यांनी चांगली सुरुवात केली व 18:21.505 च्या एकूण लॅपवेळेसह १६ वे स्थान मिळवलेमात्र दुर्देवाने ते टीमसाठी पॉइंट्स मिळवू शकले नाही. मात्रअंतिम रेसमध्ये त्यांनी स्थैर्य राखत आपले कौशल्य दाखवून दिले. वेग आणि अचूकतेसह चेकर्ड लाइन पार करताना त्यांनी दुसऱ्या रेसमध्ये १४ वे स्थान मिळवलेतर 18:17.388 ची वेळ नोंदवली. तगडी स्पर्धा देणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी धीराने सर्किटच्या आव्हानांतून मार्ग काढला व अखेर या चॅम्पियनशीपमध्ये टीमसाठी मोलाचे दोन पॉइंट्स मिळवले.

दुसरीकडे कविन यांचे सहकारी मल्लपुरमचे मोहसिन परांबेन यांनी AP250cc च्या पहिली रेस संपवण्यासाठी कडवी झुंज दिली आणि २२ वे स्थान मिळवले. चिकाटी व कौशल्याचे प्रदर्शन करत त्यांनी तीन स्थानांची आघाडी घेतली व १९ वे स्थान मिळवले. आजच्या रेसमध्ये त्यांनी 18:53.400 ची लॅप वेळ नोंदवली.

दुसऱ्या फेरीच्या अखेरीस इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमने आणखी दोन मौल्यवान पॉइंट्स मिळवत २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये (एआरआरसी) आतापर्यंत एकूण २१ पॉइंट्स मिळवले.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, संपूर्ण फेरी अटीतटीची होती. आमच्या रायडर्सनी ट्र्रॅकवर असामान्य कामगिरी केली. कविन आणि मोहसिन यांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचा मला आनंद वाटतो. कोणत्याही दुर्घटनेशिवाय अतिशय सफाईदारपणे त्यांनी रेस पूर्ण केली. कालच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करून आम्ही दुसऱ्या रेसमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी नव्याने डावपेच आखले. दोन्ही रायडर्सनी या फेरीत आपले कौशल्य आणि जिद्द दाखवून दिली. आम्ही प्रत्येक फेरीत झालेल्या चुकांमधून धडा घेत रायडर्सना होंडाच्या मार्गदर्शकांच्या मदतीने त्यांचे तंत्र उंचावण्यासाठी मदत करत आहोत. आगामी फेरीत यापेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे.

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडियाचे रायडर कविन क्विंतल म्हणाले, दुसऱ्या रेसने माझे कौशल्य आणि सहनशक्तीची कसोटी पाहिली. ट्रॅकवर मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला व कालच्या रेसने दिलेला संपूर्ण अनुभव त्यासाठी वापरला. आजच्या कामगिरीचे परीक्षण करून पुढच्या फेरीसाठी आणखी चांगले डावपेच मी आखणार आहे. स्थैर्य राखून योग्य वेळेस संधीचा वापर करून पुढे जाणे यावर माझा प्रमुख भर होता. मी शांत राहून सातत्यपूर्ण पद्धतीने रेस संपवण्यावर आणि टीमसाठी पॉइंट्स मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. संपूर्ण एचएमएसआय टीमने दिलेला पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडरचे मोहसिन परांबेन म्हणाले, आजची स्पर्धा अतिशय तीव्र होती आणि ट्रॅकवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मी केला. एचएमएसआयचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्माननीय आहे. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी यापुढेही मी प्रयत्न करत राहीन. मार्गदर्शकांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ससाठी नवीन धोरण आखत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यावर माझा भर असेल.

इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम आता ६-८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान चीनमध्ये होणार असलेल्या एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पाचल्या फेरीसाठी सज्ज होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading