विनायक मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसंग्राम संघटनेच्या वतीने कपडे वाटप
पुणे:बहुजन मराठयांचे नेते स्व.विनायकराव मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सेंट जोन्स होम, गुरुवारपेठ या वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान व कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास पुण्याच्या माजी महापौर सौ.कमळ व्यवहारे, पी.एम.टी. चे माजी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे, डेक्कन मराठा शिक्षण संस्थेचे सचिव अजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश मोहोळ, संजय पासलकर, आशुतोष धोडमिसे, रवींद्र भोसले, नितीन ननावरे, नवनाथ पायगुडे, महेश पवार, संजय लोंढे, अभिजित म्हसवडे, प्रशांत पवार, कपिल पवार, राजेंद्र मेमाणे आदी उपस्थित होते.
शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
