१९४२ च्या ‘‘भारत छोडो’’ आंदोलनामुळेच भारताच्या स्वातंत्र्याला कलाटनी मिळाली- दिप्ती चवधरी
पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेस भवन येथे माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करण्यात आला.
यावेळी बोलताना दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘८ ऑगस्ट १९४२ साली मुंबईमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन होते. त्या अधिवेशनामध्ये सर्वांनुमते ठराव झाला की इंग्रजांनी भारत देश सोडावा. त्यानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ चा नारा दिला. त्याच दिवशी रात्री इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक करून तुरूंगात टाकले. ९ ऑगस्ट १९४२ ला अरूणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींनी मुंबईच्या गवालिया टँक येथे तिरंगा झेंडा फडकविला. अशा अनेक महिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या.त्या ठिकाणी पोलीसांनी सत्याग्रहींवर लाठीचार्ज केला, आश्रू गॅस सोडले व गोळीबार केला. अनेक सत्याग्रही जखमी झाले व शहिद झाले. पुण्यामध्ये १४ वर्षीय नारायण दाभाडे हे काँग्रेस भवनमध्ये तिरंगा झेंडा फडकविण्यास येत असताना ब्रिटीशांनी केलेल्या गोळीबारात ते शहिद झाले. १९४२ च्या ‘‘भारत छोडो’’ आंदोलनामुळेच भारताच्या स्वातंत्र्याला कलाटनी मिळाली. या आंदोलनात शहिद झालेल्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो. तसेच मा. शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांनी आज ध्वजवंदन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.’’
यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव जोशी यांनी लिहिलेल्या ‘वंदन अखेरचे’ या लेखाचे वाचन केले. तसेच स्वा. सै. कै. संभाजी हरि कुंभार यांचे नातू चंद्रकांत कुंभार व सेवासदन शाळेचे राजेंद्र महागडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, आ. रविंद्र धंगेकर, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, अनंत गाडगीळ, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, संगीता तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, नीता रजपूत, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, हनुमंत पवार, प्रकाश पवार, प्रशांत सुरसे, सुजित यादव, राजेंद्र पडवळ, विठ्ठल गायकवाड, भरत सुराणा, प्रा. वाल्मिक जगताप, प्रविण करपे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, हेमंत राजभोज, बळीराम डोळे, अनुप बेगी, अनिल पवार, भगवान कडू, शिलार रतनगीरी, रवि पाटोळे, रवि ननावरे, दिपक ओव्हाळ, जयकुमार ठोंबरे, आशितोष शिंदे, अनुसया गायकवाड, रजिया बल्लारी, छाया जाधव, ज्योती परदेशी, उषा राजगुरू, अश्विनी गवारे, कान्होजी जेधे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
