Monday, October 19, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शेंडा पार्क ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय करण्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर रुग्णालयातील इमारतींना रंगकाम, रस्ते दुरुस्ती, खिडक्या दुरुस्ती, दरवाजे दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी 48.45 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या

वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी  ११ कोटी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री  मुश्रीफ यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading