Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अर्ज स्वीकृतीला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या स्पर्धक संघांच्या अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली असून उद्याही (दि. 4) अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, संस्थेचा 87वा वर्धापन दिन आज (दि. 3) पारंपरिक पद्धतीने श्री नटराज पूजन करून साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक, अंतिम फेरीचे परिक्षक दीपक रेगे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर–जोग, शामराव जोशी, अभिनेते योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे लॉटस्‌‍ दि. 7 ऑगस्ट  रोजी काढण्यात येणार असून स्पर्धेला दि. 16 ऑगस्ट पासून भरत नाट्य मंदिर येथे सुरुवात होत आहे. अंतिम फेरी दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मंगेश शिंदे, राजेंद्र नांगरे, योगेश जाधव, प्रदीप पाटसकर, राजा नातू यांच्या स्नुषा मेघना नातू या वेळी उपस्थित होते.

स्पर्धा पाहू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तसेच पुणेकरांना स्पर्धेची तिकिटे मिळण्यात अडणची येतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना स्पर्धेचा आनंद घेता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने यंदाच्या वर्षीपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सिझन तिकिटे ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून तिकिट विक्रीला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन तिकिट विक्री : https://www.ticketkhidakee.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading