सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या अभ्यासिकेतील दालनात महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, संचालक डॉ. विलास आढाव, डॉ. अपर्णा राजेंद्र आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विविध कर्मचारी व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
