Wednesday, May 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ व्यक्तव्याला राजकीय रंग नको – देवेंद्र फडणवीस

मुंबई  : सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर अमरावतीत भिडे विरुद्ध गुन्हाही दाखल केला गेला आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ व्यक्तव्याला राजकीय रंग नको अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य अनुचित आहे. संभाजी भिडेच काय कोणीच कोणीच असे वक्तव्य करू नये. करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे संताप तयार होतो.

लोक महात्मा गांधीच्या विरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांनाही इशारा दिला आहे.

संभाजी भिडे यांचा  भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याच काही कारण नाही. ज्या पद्धतीने या वक्तव्याचा काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गल्लीछ शब्दात राहुल गांधी बोलतात. त्याचाही निषेध कॉंग्रेसवल्यानी त्यांनी केला पाहिजे. असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading