Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

पूज्य दादा वासवानी यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेतील ४ शहरांसह एका राज्यात २ ऑगस्ट ‘जागतिक क्षमा दिन’ म्हणून घोषित

पुणे : पूज्य संत दादा जे. पी. वासवानी यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्य, न्यूयॉर्क शहर, सेकॉकस शहर, पूर्व ब्रन्सविक शहर आणि गुटेनबर्ग शहर, न्यू जर्सी येथे दि. २ ऑगस्ट २०२३ हा दिवस ‘जागतिक क्षमा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवसाचे महत्त्व ओळखून प्रेम, शांतता यांचा प्रचार केला जातो. या मोहिमेद्वारे जगभरातील व्यक्ती आणि समुदायांमध्ये क्षमाशिलतेबाबत जागृती करून त्यांच्या हृदयात सकारात्मक बदल घडवत क्षमा स्वीकारण्याबाबत त्यांचे मतपरिवर्तन करते.

‘जागतिक क्षमा दिन’ हा साधू वासवानी मिशनच्या नेतृत्वाखालील वार्षिक उपक्रम आहे. याद्वारे व्यक्ती आणि समुदायांमध्ये समजूतदारपणा, सहानुभूती आणि परस्परांबद्दल प्रेम वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. आपल्या मनातून द्वेष आणि वैमनस्य सोडून द्यावे, याबद्दल प्रोत्साहन दिले जाते. यातून समाजात सुसंवाद वाढवून आणि शांतता वाढण्यास मदत होते. या उपक्रमाने असंख्य व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श केला आहे, सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा दिली आहे आणि देशा-देशांच्या सीमा ओलांडून प्रेम-एकोपा वाढवण्याचे मार्गदर्शन केले.

दूरदर्शी आध्यात्मिक गुरू आदरणीय दादा जे.पी. वासवानी यांचा दि. 2 ऑगस्ट हा दिवस वाढदिवस असतो. क्षमा, सहानुभूती, प्रेम आणि शांतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक क्षमा दिन’ म्हणून घोषित करून, त्यांनी त्यांचा चिरस्थायी वारसा आणि अधिक सामंजस्यपूर्ण समाजाकडे जाण्याचा मार्ग म्हणून क्षमा स्वीकारण्याचे महत्त्व मान्य केले. साधू वासवानी मिशनच्या प्रयत्नांना याद्वारे मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. याद्वारे क्षमा आणि शांतीचा संदेश प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या घोषणेद्वारे सर्व नागरिक, संस्था आणि समुदायांना ‘जागतिक क्षमा दिन’ साजरा करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले जाते आहे. क्षमा, प्रेम आणि दयाळूपणाच्या कृतींद्वारे आपण सहानुभूती आणि आशेने भरलेल्या जगासाठी एकत्रितपणे योगदान देऊ शकतो, असे आवाहन साधू वासवानी मिशनने केले आहे.

या उत्सवाचा एक भाग म्हणून, दि. २ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या भारतीय वाणिज्य दूतावासात स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता एक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. ज्याला “शांततेचा क्षण’ म्हणून तो ओळखला जातो. यावेळी क्षमा करण्याचा सराव करताना २ मिनिटांचे मौन पाळायचे असते. साधू वासवानी मिशनचे मुख्यालय असलेल्या पुण्यासह जगभरातील अनेक शहरांमध्ये अशाच प्रकारचे शांततेचे सत्र आयोजित केले जात आहे. हे क्षमा आणि शांततेच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी, व्यक्ती आणि समुदायांना त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात क्षमाशीलतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

‘पूज्य दादा जे.पी. वासवानी यांच्या जीवनाचा आणि शिकवणीनुसार ‘जागतिक क्षमा दिन’ साजरा करत असताना दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी आमच्यासोबत सामील व्हा. चिरस्थायी शांती आणि समजूतदारपणाचा मार्ग म्हणून आपण एकत्रितपणे क्षमा स्वीकारूया,’ असे आवाहन साधू वासवानी मिशनने केले आहे.

जागतिक क्षमा दिनाच्या अधिक माहितीसाठी  http://www.momentofcalm.org या संकेतस्थळाला भेट द्या, अपडेट फॉलो करा आणि #GlobalForgivenessDay वापरून सोशल मीडियावरील चर्चासत्रात सहभागी व्हा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading