Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव निमित्ताने जनसंपर्क संस्थेस स्वारस्य अभिव्यक्ती आवेदनासाठी आवाहन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यापीठात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी, आवश्यक दृकश्राव्य साहित्यनिर्मितीसाठी व ब्रॅंडिंग बाबतच्या कामासाठी जनसंपर्क संस्थेची नेमणूक करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने संकेतस्थळावर परिपत्रक क्र. १५० प्रसिद्ध केले असून त्यानुसार प्रसिद्ध जनसंपर्क संस्थेस या कामासाठी आवेदन करण्याचे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. या जनसंपर्क संस्थेकडून अमृत महोत्सवानिमित्ताने विद्यापीठात होणाऱ्या विविध उपक्रमांची वर्तमानपत्रे, मासिके, न्यूज चॅनेल, युट्युब, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हाट्सअप आदी समाजमाध्यमात प्रसिद्धी देणे तसेच डॉक्युमेंटरी व्हिडीओ तयार करणे, सोशल मीडिया साईट डिझाईन करणे अशा कामाचे समावेश असेलेले विविध काम करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात सर्व अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ असून गुणवत्तापूर्ण संशोधन व शिक्षण यात विद्यापीठाचा नावलौकिक आहे. विद्यापीठाने आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून २०२३ – २४ या वर्षात आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading