Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरला NIA ने केली अटक

पुणे : देशविरोधी कारवाया केल्या प्रकरणी  महाराष्ट्र पोलीस आणि विविध राष्ट्रीय तपास संस्थांकडून पुण्यात कारवाई केली जात आहे. आता आणखी एक मोठी कारवाई शहरात करण्यात आली आहे. ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात   एनआयए  ने गुरुवारी कोंढवा परिसरातून एका प्रसिद्ध डॉक्टरला अटक केली आहे. आरोपी प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असून शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल्स मध्ये आपली सेवा देत असतो यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए ने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत डॉ. अदनानली सरकार (वय-43) याला अटक केली आहे. एनआयएने सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स   आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी  भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

डॉ. अदनानली सरकारने पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज मधून 2001 साली MBBS तर 2006 साली MD पदवी प्राप्त केलेली आहे.  मागील 16 वर्षांपासून शहरातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी भूलतज्ज्ञ म्हणून सेवा दिली आहे.

आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS) सारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ISIS च्या दहशदवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकार विरोधात  दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading