Friday, May 15, 2026
BusinessLatest News

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

फेडरल बँक लिमिटेडद्वारा प्रमोटेड फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (“एफएफएसएल” किंवा “कंपनी”) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“सेबी”) आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केले आहे. ( DRHP was submitted to SEBI by FedBank Financial Services Limited)

भारतामध्ये खाजगी बँकांकडून प्रमोट केल्या जात असलेल्या पाच एनबीएफसींपैकी एक फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आहे.  सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग तसेच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सेवा पुरवण्यावर या कंपनीने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेयर्सच्या ऑफरमार्फत फंड्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. या ऑफरमध्ये ७५०० मिलियन रुपयांपर्यंतचे नव्याने जारी करण्यात आलेले इक्विटी शेयर्स आणि “प्रमोटर शेयरहोल्डर्स” व “इतर शेयरहोल्डर्स”कडून ७०,३२३,४०८ पर्यंत इक्विटी शेयर्सच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

७०,३२३,४०८ पर्यंत इक्विटी शेयर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये द फेडरल बँक लिमिटेडकडून (“प्रमोटर शेयरहोल्डर”) १६,४९७,९७३ पर्यंत इक्विटी शेयर्स आणि ट्रू नॉर्थ फंड व्हीआय एलएलपी (“इतर शेयरहोल्डर्स”) कडून ५३,८२५,४३५ पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे.

नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सच्या विक्रीतून उभारल्या जाणार असलेल्या रकमेचा उपयोग व्यवसाय व संपत्तीतील वाढीमुळे भविष्यात जी भांडवलाची आवश्यकता निर्माण होईल ती पूर्ण करण्यासाठी पहिल्या स्तरातील भांडवल आधार वाढवण्यासाठी करण्याचे फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने करण्याचे ठरवले आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सपैकी काही भाग ऑफरचे खर्च पूर्ण करण्यासाठी देखील वापरला जाईल.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, बीएनपी परिबास, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading