Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा. लक्ष्मण साने यांचे निधन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक लक्ष्मण यशवंत साने (वय ९२) यांचे येथे निधन झाले.

पुणे, सांगली, कराड आणि अमरावती या चार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये साने यांनी दीर्घकाळ यशस्वीपणे अध्यापनाचे कार्य केले. अत्यंत संयमित आणि मितव्ययी जीवन जगताना जो धनसंचय होत असे ती रक्कम ते विविध सामाजिक कामांसाठी देत असत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी सुरू झालेल्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या समाजसेवक सहाय्यता निधी या योजनेसाठीही प्रा. साने यांनी भरीव अर्थसहाय्य केले होते. त्यांच्या आर्थिक सहाय्यातूनच ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

जनकल्याण समितीने स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने गौरविलेल्या युवा समाजसेवकांनाही त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. याशिवाय इतरही अनेक सामाजिक संस्थांना त्यांचे अर्थसहाय्य वेळोवेळी लाभले होते. अभियांत्रिकी अध्यापनाच्या क्षेत्रात नाणावलेले प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading