दुर्दैवी : इर्शाळवाडीवर दरड कोसळली; 10 जणांचा मृत्यू, शेकडो ढिगाऱ्याखाली अडकले
रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. मुरबे धरणाच्या जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 98 जणांना ढीगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर अजूनही शेकडो लोक डिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री 10 ते 11 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल दिवसभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. या गावात 38 घर असून जबाळपास २५० लोकवस्ती आहे. ( Unfortunate: A crack fell on Irshalwadi; 6 people died, many were trapped under the debris)
पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. मदत कार्य करण्यासाठी एनडीआरफचे पथक येथे दाखल झाले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्य करण्यास अडचण येत आहे. मदत कार्य करण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या एका जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
