पुणे : कोटेड स्टील उत्पादने पुरवणारी आघाडीची कंपनी टाटाब्ल्यूस्कोप स्टीलला महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३ या अतिशयप्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे टाटाब्ल्यूस्कोप स्टीलने मनुष्यबळ क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान तसेचकामासाठी अनुकूल व सर्वांच्या दृष्टीने लाभदायक वातावरण निर्माणकरण्याप्रती कंपनीच्या बांधिलकीचे फलित आहे.
साहस, योग्यता, दर्जा, सहयोग आणि दयाभाव या पाच तत्त्वांवर भर देणारेप्रभावी व पोषक असे कामाचे वातावरण निर्माण करण्याप्रती टाटा ब्ल्यूस्कोपस्टीलची निष्ठा त्यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड२०२३ मधून दिसून येते. स्टील उद्योगक्षेत्रात सातत्याने नवे मापदंड स्थापन करतअसतानाच ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रगती आणि एकंदरीतसमाधान यासाठी देखील वचनबद्ध आहे.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर श्रीमती नीनाबहादूर यांनी सांगितले, “या पुरस्कारामुळे संपूर्ण टाब्ल्यूवियन समुदायालाअजून जास्त उत्कृष्ट कामगिरी बजावण्याची, खासकरून स्टील उद्योगक्षेत्रातआपले स्थान अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळालीआहे. आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की, उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तमप्रोफेशनल्स आमच्याकडे आहेत, कंपनीचे आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचे संबंधसामंजस्याचे, परस्परांना लाभदायक ठरतील असे आहेत व दीर्घकाळपर्यंतटिकून राहण्याची क्षमता त्यामध्ये आहे. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलमधीलजीवनामध्ये काम व आनंददायी क्षण यांचा उत्कृष्ट मिलाप आहे, त्याचबरोबरीने याठिकाणी व्यक्तिगत उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यावर देखील भरदिला जातो.”
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलमध्ये कामाचे प्रोफेशनल वातावरण निर्माण व्हावे, टिकूनराहावे यावर भर दिला जातो, त्यासाठी लोकांना उपयुक्त ठरतील अशी धोरणे, वैविध्यपूर्ण कार्य संस्कृती, टीम सदस्यांकडून विशेष माहिती यांचा अवलंब वस्वीकार केला जातो, ग्राहकांच्या वास्तविक समस्या तितक्याच उत्साहानेसोडवल्या जातात. मानवी पैलूवर ही कंपनी विशेष भर देते, त्यामुळेकर्मचाऱ्यांना त्यांना महत्त्व व पाठिंबा मिळत असल्याचा अनुभव घेता येतो.
Related