इर्शाळवाडी दुर्घटना : रेस्कू ऑपरेशनसाठी एअरलिफ्ट करण्याची तयारी
रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. डोंगर माथ्यावर असलेल्या घरांवर दरड कोसळल्याने येथे मदत कार्यासाठी मोठे अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर रेस्कू ऑपरेशनसाठी एअरलिफ्ट करण्याची तयारी राज्य प्रशासनांने सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तात्पुर्ते हेलीपॅड येथे बसवण्यात आले आहे. ( Irshalwadi accident: Preparations for airlift for rescue operation)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलेल्या माहितीनुसार, मुंबई पासून 80 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव भूस्खलन यादीत नाही. मात्र, सततच्या पावसामुळे इर्शाळवाडीत ही दुर्घटना घडली आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याने घटनास्थळी बचाव कार्य पोहचण्यास उशीर झाला. शिवाय घटनास्थळी जाण्यासाठी रास्ता नाही. पायथ्या पासून घटनास्थळी जाण्यासाठी तासभर वेळ लागतो. जेसीबी किंवा इतर वाहन येथे पोहचू शकत नाही. शिवाय सततचा पाऊस आणि चिखल यामुळे बाचावकार्य जलद गतीने शक्य होत नाही. त्यामुळे रेस्कू ऑपरेशनसाठी एअरलिफ्ट करण्याची तयारी राज्य प्रशासनांने सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तात्पुर्ते हेलीपॅड येथे बसवण्यात आले आहे.
दरम्यान, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे पिडीत नागरिकांना एअरलिफ्ट करणे शक्य होते की नाही याबाबत शंका आहे.
