Monday, May 25, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

BJP – पुणे शहाराध्यक्षपदी धिरज घाटे तर PCMC मध्ये शंकर जगताप

पुणे – भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलले आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश असून शहराध्यक्ष पदावरून माजी आमदार जगदीश मुळीक यांना हटवण्यात आले असून नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक धिरज घाटे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली आहे.

पुणे शराबरोबरच पिंपरी – चिंचवड शहराची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून काढून घेण्यात आली असून तिथे माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने ग्रामीण भागातही बदल केला आहे. पुणे जिल्हा ग्रामीण (बारामती) विभागाची जबाबदारी वासुदेव काळे आणि पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील यांची नेमणूक केली आहे.

पुणे शहराध्यक्षपदी निवड झालेले धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत सध्या ते पुणे शहर प्रभारी व प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते.

या निवडीनंतर घाटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे राज्यात भा ज पा सेना राष्ट्रवादी चे असलेले मजबूत सरकार केंद्रात हिंदुस्थान चे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना ही जबाबदारी मिळालेली आहे पुणे शहरात भारतीय जनता पार्टी येत्या सर्व निवडणुका अत्यंत जोमाने जिंकून आणून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading