fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

कसबा मतदार संघातील समस्यांसंदर्भात हेमंत रासने यांच्यावतीने पालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : कसबा मतदार संघातील पेठ विभागातील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच जुन्या वाड्यातील ड्रेनेज लाईन यासंदर्भातील *तक्रारी तसेच मोठ्या पावसामध्ये नागझरी लगत असणाऱ्या वसाहती मध्ये पावसाळ्यात होणाऱ्या पाणी समस्यांच्या दृष्टीने उपाययोजना करणे तसेच जुन्या ड्रेनेज लाईन जेणेकरून जुन्या वाड्यालगत घुशी मुळे खराब झालेल्या लाईनची दुरुस्ती करणे तसेच पेठांमधील मोठ्या व लहान वसती मध्ये असलेली ड्रेनेज लाईन जेटिंग मशीनच्या साह्याने साफ करणे तसेच पेठांमधील धोकादायक वाढलेली झाडे व फांद्यांची छाटणी करणे तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करणे व त्याची साफसफाई करणे या संदर्भातील निवेदन पुणे मनपाचे आयुक्त श्री विक्रम कुमार साहेब यांना कसबा *विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत  रासने यांच्यावतीने देण्यात आले

यावेळी,कसबा मंडळ अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, राणी कांबळे, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष बाप्पू मानकर, मा.नगरसेवक, अजय खेडेकर, मनीषा लडकत, विष्णू हरिहर,मनीष साळुंखे,महिला अध्यक्ष अश्विनीताई पांडे, यु.मो. अध्यक्ष अमित कंक, पुणे शहर कार्यालय मंत्री संजय देशमुख, प्रभागचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*

या समस्यांमध्ये महापालिकेच्या विविध विभागातील पुढील तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे.

1.पाणीपुरवठा
कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्यांची दखल घेऊन परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.

  1. रस्ते विकास
    विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यात पडलेले खड्डे बुजविणे, डांबरीकरण करण्याची गरज आहे.
  2. पार्किंग
    कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पार्किंगचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. तसेच पार्किंगच्या पट्ट्याही अस्पष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.
  3. पदपथ
    कसबा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश पदपथांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. तसेच पदपथ नादुरुस्त झालेले आहेत. चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या खुणा अस्पष्ट झाल्या आहेत. मतदारसंघातील पदपथ दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येईल.
  4. ड्रेनेज लाईन आणि पावसाळी गटारे मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत .चेंबर खचलेली आहेत. ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच पावसाळी गटार लाईन मधील राडाराडा काढून ते प्रवाही करण्याची गरज आहे.
  5. सुलभ शौचालयांची दुरुस्ती
    कसबा विधानसभा मतदारसंघातील वस्ती विभाग आणि जुन्या वाड्यांच्या परिसरामध्ये सुलभ शौचालये दुरावस्था झालेली आहे. दरवाजे बदलणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आले. कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात.
  6. वृक्ष छाटणी
    पावसाळा अर्ध्यावर आला तरी देखील मतदारसंघातील धोकादायक पद्धतीने वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कृपया तातडीने वृक्षांची छाटणी करावी
  7. पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा
    मतदारसंघात विविध ठिकाणी पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी नवीन उभारण्याची गरज आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही त्यासाठी उपाय योजना कराव्यात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading