Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

पुणे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादांच्याच पाठिशी : दीपक मानकर

पुणे : ‘शहरातील कार्यकारिणीमध्ये सर्व घटकांतील ज्येष्ठ, महिला, पुरुष, युवक युवती, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी करून सर्वांना काम करण्याची योग्य संधी देण्यात येणार असून पुणे शहरातून मोठी ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी उभी केली जाईल’, असा निर्धार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यकारिणी बैठकीत केला.

शहर राष्ट्रवादीची पहिली कार्यकारिणी शहराध्यक्ष मानकर यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. उत्फूर्त वातावरणात झालेल्या या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, कार्याध्यक्षा पूनम पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, शंकर केमसे, अप्पा रेणुसे, बंडू गायकवाड प्रकाश कदम, महेश शिंदे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, प्रिया गदादे, भैय्यासाहेब जाधव, सदानंद शेट्टी, बाबा पाटील यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात राष्ट्रवादी मजबूत करतानाच सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा निर्धार करत मानकर पुढे म्हणाले, ‘अजितदादांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुणे शहरात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असेल. शिवाय लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्यालय नव्याने उभे केले जात असून ते माझ्या वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल, ही हमी देतो.’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री महोदयांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading