पूना क्लब स्क्रॅबल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या शेरवीन रॉड्रिग्जला विजेतेपद
पुणे : पूना क्लब लिमिटेड आयोजित पूना क्लब स्क्रॅबल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या शेरवीन रॉड्रिग्ज याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब येथील सिनेमा हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ४४ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या सहभागी संघांची अ व ब या दोन गटात विभागणी करण्यात आली. अ गटात मुंबईच्या शेरवीन रॉड्रिग्जने (+२५३४) गुणांसह विजेतेपद पटकविले. तर, पुण्याच्या उदयन ग्रोव्हर(+१२१०गुण) व बंगळुरूच्या इशिका शिवलिंगाई(+७५९गुण) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
ब गटात बंगळुरूच्या आर नलिनी हिने (+८९८) गुणांसह प्रथम स्थान पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अशोक भांडारकर, आर नलिनी, नीना सहानी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अ गट:
शेरवीन रॉड्रिग्ज(२५३४गुण)
उदयन ग्रोव्हर(१२१०गुण)
इशिका शिवलिंगाई(७५९गुण)
माधव कामत(३८६गुण)
