Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

श्रमजीवींची शक्ती आणि नरेंद्र मोदी यांची निष्ठा या संसद भवन निर्मितीतील भक्कम बाजू

नवीन संसद भवनचे वरिष्ठ सल्लागार विनायक देशपांडे यांचे मत सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान
पुणे सार्वजनिक सभेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन 
 
पुणे : संसद भवन उभारण्यामध्ये अथक परिश्रम करणारा कामगार वर्ग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विविध राज्यातील कामगार या कार्यात सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’ असे म्हणत  कामगार कामाला सुरुवात करीत, ही सर्व ऊर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आली. श्रमजीवींची शक्ती आणि नरेंद्र मोदी यांची निष्ठा आणि पाठिंबा या संसद भवन निर्मितीतील भक्कम बाजू होत्या, असे प्रतिपादन नवीन संसद भवनचे वरिष्ठ सल्लगार विनायक देशपांडे यांनी केले.
पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने २०२३ चा सार्वजनिक काका पुरस्कार विनायक देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. अरण्येश्वर चौकातील सुपर्ण कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी निवृत्त विंग कमांडर विनायक डावरे, संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कार्यवाह शरद गर्भे यांसह विश्वस्त व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, ५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्काराची रोख रक्कम देशपांडे यांनी संस्थेला देणगी स्वरुपात दिली.
विनायक देशपांडे म्हणाले, नवीन संसद भवन उभारण्यात मला काम करायची संधी मिळाली याचा अभिमान वाटतो. अद्ययावत तरीही भारतीय संस्कृतीला जपणारी अशी ही वास्तू आहे. २४ महिन्यात ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी संसद भवन उभारणीचे काम केले आहे. जागतिक दर्जा असलेली ही वास्तू निर्माण झाली असून त्याच्या उभारणीसाठी सर्व साहित्य हे भारतातले आहे.अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
विनायक डावरे म्हणाले, नवीन संसद भवनचे वरिष्ठ सल्लगार विनायक देशपांडे हे आपल्यातील आहेत याचा अभिमान वाटतो. लोकशाहिचे मंदिर बांधण्यात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्यातील आत्मनिष्ठेमुळे हे कार्य त्यांच्या हातून शक्य झाले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्याधर नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
भारत साबळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिदोरे यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading