Monday, May 25, 2026
BusinessLatest News

वी ने आणले नवे सुपर डेटा पॅक्स जे तासांवर आणि दररोज वापरता येतील

लोकांच्या डेटा वापराच्या गरजा सातत्याने वाढत आहेत. काम असो किंवा व्यक्तिगत वापर, डेटा ही आता एक गरज बनली आहे. आजच्या काळात युजर्स डेटावर आपल्या रोजच्या अनेक कामांसाठी डेटावर खूप जास्त प्रमाणात अवलंबून आहेत.  काहीवेळा तर कॉलेज प्रोजेक्ट, ऑनलाईन असाइनमेंट, एखादा संपूर्ण शो सलग बघण्यासाठी, गेम खेळण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी खूप जास्त प्रमाणात किंवा अखंडित डेटाची गरज भासते. अशावेळी प्रीपेड ग्राहकांना दैनंदिन डेटा कोटाचे बंधन असल्यामुळे महागड्या ऍड-ऑन डेटा पॅक्सवर अवलंबून राहावे लागते. अतिशय महत्त्वाची आणि मोठ्या प्रमाणात वाढत असलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी, देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने ‘सुपर अवर’ आणि ‘सुपर डे’ हे दोन अनोखे सॅशे डेटा पॅक्स सादर केले आहेत. या पॅक्समुळे वी प्रीपेड युजर्सना कोणताही खंड न पडता मनोसोक्तपणे डेटाचा वापर करता येईल, सहाजिकच युजर्सना मिळणाऱ्या अनुभवात लक्षणीय वाढ होईल.

 

या पॅक्सच्या किमती सहज परवडण्याजोग्या आहेत – वी ‘सुपर अवर’ मध्ये फक्त २४ रुपयांमध्ये मिळतो अनलिमिटेड डेटा जो तुम्हाला ६० मिनिटे वापरता येतो. वी ‘सुपर डे’ मध्ये फक्त ४९ रुपयांमध्ये ६ जीबी डेटा मिळतो जो तुम्ही २४ तास वापरू शकता.

 

डेटा पॅक डेटा लाभ वैधता किंमत
सुपर अवर अनलिमिटेड १ तास २४ रुपये
सुपर डे ६ जीबी २४ तास ४९ रुपये

हे सॅशे पॅक खासकरून अशा युवक आणि युवा वयस्कांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत ज्यांना खूप जास्त प्रमाणात डेटा हवा असतो. या पॅक्सचा लाभ घेऊन वी प्रीपेड ग्राहक त्यांना हवे तितके सिनेमे, व्हिडिओ पाहू शकतील, गाणी, संगीत ऐकू शकतील, गेम खेळू शकतील, सर्फिंग, चॅटिंग, काम, अभ्यास करू शकतील आणि हे सर्व करत असताना त्यांना डेटा संपेल याची भीती बाळगण्याची गरज उरणार नाही.  वी गेम्स खेळण्यासाठी, वी मुव्हीज अँड टीव्हीवर नवनवीन सिनेमे व व्हिडीओज् चा आनंद घेण्यासाठी किंवा वी म्युझिकवर आवडती गाणी ऐकण्यासाठी देखील युजर्स या पॅक्सचा वापर करू शकतील.  हे सर्व वी ऍपवर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading