Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

अर्जुनच्या मनात पेटणार गैरसमजाची ठिणगी!

अप्पी आमची कलेक्टर ह्या मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. नुकतंच आपण पाहिलं की अर्जुन अप्पीने बनवलेली चूल विस्कळीत करतो आणि छकुली, दिप्याच्या मदतीने गावात आप्पीचे व त्याचे लागलेले पोस्टर तो काढतो. छकुली अप्पी अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे संकल्प अप्पीचा पाठलाग करतो आणि त्याला कळते अप्पी प्रेग्नंट आहे. पुढे त्याला आप्पी डॉक्टरच्या असिस्टंट सोबत गप्पा मारताना दिसते. संकल्प आणि मनी, अर्जुन आणि अप्पीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी अर्जुनला अप्पी व असिस्टंटची भेट होत असताना दाखवतात व  अप्पीच्या विरुधात भडकावतात. आता अर्जुनच्या मनात पेटणार का गैरसमजाची ठिणगी? हे पाहणे रोमांचक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ सोमवार ते शनिवार संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading