Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवा जगदीश मुळीक यांची मागणी

पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

नगर रस्त्यावरील फिनिक्स चौक परिसरात मुळीक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक , अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह अधिकारी व स्थानिक उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चार वर्षांपू्वी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करण्यात आले होते. त्यात पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार केला होता. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती.

त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससंख्या, ठिकठिकाणी उड्डाण पूल / ग्रेडसेपरेटर / भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांचा समावेश होता.

त्यापैकी गोल्फ चौक उड्डाण पूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या आराखड्यातील कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क पुलाचे काम तातडीने सुरू करावे आणि शिवणे ते खराडी रस्त्याला गती द्या, कल्याणी नगर परिसरातील रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती करा अशा मागण्या मुळीक यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading