परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन उद्या पुण्यात
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने दक्षिण भारतीय व विशेषतः पुण्यातील केरळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी
व्ही मुरलीधरनजी, भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, उद्या, शनिवार दि. 1 जुलै 2023 रोजी पुण्यात येत आहेत.
समाजाच्या विविध घटकांची संवाद साधण्याचा या अभियानात दक्षिण भारतीय नागरिकांशी ते यानिमित्ताने संवाद साधणार आहेत. पुण्यात विविध क्षेत्रात दक्षिण भारतीय अग्रेसर असून त्यांच्याशी यानिमित्ताने संपर्क अभियान राबवले जात आहे।
या निमित्ताने मा मुरलीधरनजी यांनी आपल्या खासदार निधीतून पुण्यातील दक्षिण भारतीय यांनी चालवलेल्या संस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा ही कार्यक्रम होणार आहे. नवीन शिक्षण धोरण शिक्षणात मूलगामी बदल करणाऱ्ये असून त्यासाठी शाळांनी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, या हेतूने पुण्यातल्या निवडक शाळांना आपल्या खासदार निधीतून ते सहकार्य करणार आहेत.
हा निधी या कार्यक्रमात शाळांना सुपूर्द केला जाईल.
या निमित्ताने होणाऱ्या संवाद कार्यक्रमात दक्षिण भारतीय पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश पांडे व दक्षिण भारतीय आघाडीचे पुण्याचे अध्यक्ष श्री मनोज पिल्ले यांनी केले आहे.
शनिवार,दि. एक जुलै 23 रोजी औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात सायंकाळी हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, धीरजी घाटे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिकाधिक नागरिकांनी या संवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे.
