Wednesday, September 2, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

आता फॉर्म 16 शिवाय IT रिटर्न भरता येणार

नवी दिल्ली : आयकर विवरण भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31  जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. आयकर विवरणपत्र भरताना अनेक प्रकारची कागदपत्रेही आवश्यक असतात. फॉर्म 16 हे देखील या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीला आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 आवश्यक आहे. आयकर विभागाने केलेल्या नियमांनुसार प्रत्येक कार्यालयाने आपल्या टीडीएस उत्पन्न कर्मचा-­यांसाठी फॉर्म 16  जारी करणे बंधनकारक आहे. तथापि, फॉर्म 16 जारी केला नसेल आणि पगारदार व्यक्तींच्या श्रेणीत येत असाल तर फॉर्म 16 शिवाय आयकर रिटर्न भरता येऊ शकणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, पगारदार व्यक्ती फॉर्म 16  शिवाय आयटीआर दाखल करू शकतात. यासाठी त्यांना पेमेंट/सॅलरी स्लिप आणि फॉर्म 26  एएससारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. फॉर्म १६ शिवाय आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्याने संबंधित आर्थिक वर्षाशी संबंधित सर्व पगाराच्या स्लिप एकत्र केल्या पाहिजेत. या स्लिप्समध्ये पगार, भत्ते, कपाती आणि इतर कपातीचा तपशील असावा. याशिवाय पगार स्लिप, भत्ता आणि बोनस यांचा समावेश करून उत्पन्न मोजावे.


फॉर्म १६ शिवाय आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांनी व्याज, लाभांश आणि इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यांसारख्या वेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मोजायला हवेत. ही सगळी रक्कम करपात्र उत्पन्नात समाविष्ट केल्या पाहिजेत. याशिवाय, फॉर्म २६ एएस व्हेरिफाय करणेदेखील महत्त्वाचे आहे. फॉर्म २६ एआय तुमच्या पॅन कार्डवर कापलेल्या सर्व करांचा तपशील देतो. याशिवाय फॉर्म २६ एआयमध्ये नमूद केलेला टीडीएस तपशील आणि आयकरातील उत्पन्नाच्या तपशीलाशी जुळते का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. या तपशीलात काही फरक असल्यास तुम्हाला तुमच्या कार्यालयात किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच ते दाखल केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाय केल्याशिवाय तुमची आयटीआर फाइलिंग अपूर्ण मानली जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading