Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Mumbai Crime : दोन महिलांवर चाकू हल्ला, एकीचा मृत्यू

मुंबई : पुण्यातील दर्शना पवार हत्याप्रकरण त्यानंतर काल सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तुरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताज्या असतानाच देवनार मध्ये दोन महिलांवर चाकू हल्ल्याची घटना समोर आलेली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबई येथिल देवनार येथे दोन महिलांवरती चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

काजल भोसले असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून वैशाली पवार ही महिला जखमी आहे.यांच्यातल्या भांडणाचा कारण अद्याप समजू शकलो नसून याप्रकरणी देवनार पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. महिला तरुणी यांच्यावरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. काल पुण्यात एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading