Saturday, October 17, 2026
BusinessLatest News

महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन पुण्यात लवकरच सुरू करणार लक्झरीअस गेटेड कम्युनिटी प्रकल्प

पुणे : रिअल इस्टेट उद्योगातील एक प्रसिद्ध नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनला पुणे येथील भुकुम मुकाईवाडी येथे आपल्या लक्झरीअस गेटेड कम्युनिटी या आगामी प्रकल्पाची घोषणा करताना आनंद होत आहे. एक असे निवासी स्थान जे व्यक्तींना त्यांच्या मर्जीनुसार जीवन जगण्याची एक अनोखी अनुभूती देते. पुण्याजवळ १०८ एकर परिसरात ही भव्य रिसॉर्ट कम्युनिटी पसरलेली आहे. येथील ७०० आलिशान २ बीएचके विलामेंट्स आरामदायी आणि शांततापूर्ण जीवनशैलीचा अनुभव देतात. एक विलक्षण आणि दूरदर्शी प्रकल्प सादर करत आहोत—शहरातील एक शहर एक असा एक विलक्षण आणि दूरदर्शी प्रकल्प सादर करत आहोत जो तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल याची खात्री आहे.

रहिवासी आनंद, शांती आणि सुरक्षिततेचा आनंद तसेच जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ देणारा निवारा असेल अशा रितीने आगामी प्रकल्पांची खास रचना केलेली असेल. हा विस्मयकारक विकास म्हणजेच शहरामधील एक शहर असणार आहे ज्यामध्ये अत्याधुनिक रुग्णालय, पंचतारांकित रुग्णालय, विशेष क्लब, विस्तीर्ण लँडस्केप, हेलिपॅड, प्रीमियम हॉटेल आणि बऱ्याच काही सुविधा उपलब्ध करून देईल. जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त सुंदर हिरवाई आणि मोकळ्या जागांसह येथे राहणारे रहिवासी प्रदूषणमुक्त आणि शांत जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकतात.

सामान्यांच्या पलीकडे जात राहण्याचा वेगळा अनुभव देणे हा महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनचा दृष्टिकोन आहे असे,” महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विशाल देशमुख यांनी सांगितले. निसर्गाच्या सानिध्यात रहिवाशांना जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देणारा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दृष्टीकोन यांना मूर्त रूप देणारा हा प्रकल्प आहे. पुण्यात या अपवादात्मक निवासी समुदायाची ओळख करून देतांना आम्‍ही उत्‍सुक आहोत आणि खरोखर समृद्ध जीवनाचा अनुभव घेण्‍याची अपेक्षा करणार्‍या सर्व व्‍यक्‍तींना आमच्यात सहभागी होण्‍यासाठी आमंत्रित करतो.

निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठीची बांधिलकी हे या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रापंचिक कामांची चिंता न करता रहिवासी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. अत्याधुनिक जिम सुविधा, मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट आणि प्रियजनांबरोबर  फेरफटका मारण्यासाठी  निसर्गरम्य पदपथ या सारख्या सुविधा देखील येथे आहेत.

पुण्यानजीक सुलभ ठिकाणी असलेला हा प्रकल्प प्रमुख वाहतूक केंद्रे, शैक्षणिक संस्था, शॉपिंग सेंटर  आणि मनोरंजनाच्या पर्यायांची सहज उपलब्धता देतो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांना आजूबाजूच्या निसर्गरम्य निसर्गाचा आस्वाद घेत शहरी राहणीमानाचा आनंद लुटता येईल. स्वातंत्र्य, शांतता आणि आरामदायी जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचा  हा नवीन प्रकल्प एक आदर्श ठिकाण ठरू शकते. निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषणमुक्त आणि समृद्ध जीवनाचा अनुभव देते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading