Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीत योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी :सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, संगीता घाटगे, शिक्षिका ज्योती मोरे, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, क्रीडा शिक्षक अक्षय नाईक, शिक्षिका हर्षदा वाजे, प्रतिभा ओक, सीमा हवालदार, स्वप्ना जानूनकर, मीनल साकळे, सुमित्रा कुंभार, सोनिया गुरूंग, तृप्ती जगताप, अमृता अमोलिक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ध्यानधारणेने योगा दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले. विद्यार्थिनींनी योगा डान्स करत विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी शिक्षिका प्रतिभा ओक यांनी प्रकाश प्रवहन हे ध्यानाचे तंत्र विद्यार्थ्यांकडून करून घेतले.

आरती राव म्हणाल्या, की आजच्या धकाधकीच्या युगात योगा ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. योगामुळे नकारात्मक भावना, भिती, राग, नैराश्य, चिंता दूर होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. प्रणव राव यांनी सांगितले, की योगासनाने एकाग्रता, स्मरणशक्ति, विचारांची स्पष्टता वाढते. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे, असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आशा घोरपडे, नीलम पवार व शीतल मोरे यांनी योगा दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका सुमित्रा कुंभार, सोनिया गुरूंग, ज्योती मोरे यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षिका तृप्ती जगताप, अमृता अमोलिक यांनी योगसाधनेमुळे एकाग्रता वाढवण्यासाठी विविध पद्धती करून दाखवल्या.
क्रीडाशिक्षिका सुषमा पवार व क्रीडाशिक्षक अक्षय नाईक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षिका निकीता अडसुळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading