Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एनआयसी आईसक्रीम्स च्या ब्रँड अॅम्बेसेडर रश्मिका मंदाना

पुणे : वाल्को फूड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचा भाग असलेले एनआयसी हॉनेस्टली क्राफ्टेड आईसक्रीम्स (एनआयसी) ने अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला एनआयसी आईसक्रीम्ससाठी आपली पहिली ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. रश्मिकाचा जन्मजात करिष्मा आणि एनआयसीची उत्कृष्टतेशी अटळ बांधिलकी यांच्यातील उत्कृष्ट समन्वयासह उभय घटकांतील हा सहयोग केवळ समर्थनच् नव्हे तर एक अद्वितीय अनुभवाचा आविष्कार प्रदान करतो. रश्मिकाचा एनआयसीबरोबरील हा सहयोग देशभरातील आईसक्रीमप्रेमींच्या ह्दयात एनआयसी आईसक्रीमच्या चवीचा बहार फुलविणाऱ आहे.

एनआयसी हॉनेस्टली क्राफ्टेड आईसक्रीम्स भारतातील ११० शहरातील एक हजाराहून अधिक केंद्रांवर साठपेक्षा अधिक लज्जतदार प्रकाराचे आईसक्रीम प्रेमींना उपलब्ध करुन देते. नाविन्यपुर्णतेसाठी एनआयसी वचनबध्द आहे आणि ताज्यातवान्या फळांच्या निवडीतून विलक्षण मिश्रणांची नानाविध प्रकारांची श्रेणी ग्राहकांना सादर करते. सर्व आईसक्रीम्स हे शुध्द दुध आणि शुध्द अशा घटकांपासून बनविण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे या घटकांत कृत्रिम चव, रंग आणि संरक्षकाचा जराही लवलेष नाही. या घटकांची अटळ मानके हे सुनिश्चित करतात की आईसक्रीमचा प्रत्येक चमचा ग्राहकांना पौष्टिक आणि स्वादिष्ट असाच जाणवतो.

आईसक्रीमच्या नवीन ब्रॅण्ड अॅम्बेसेडरबद्दल बोलताना वाल्को फूड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजीव शहा म्हणाले,एनआयसीची पहिली ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून रश्मिका मंदान्ना ही आमच्यासोबत असल्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. तिचे लावण्य आणि आकर्षकता तिला आमच्या ब्रँड मूल्यांचे परिपूर्ण मूर्त स्वरूप बनवते. ही भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती ग्राहकांच्या विविध अभिरुची आणि प्राधान्यांची पूर्तता करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. त्याचबरोबर एकत्रितपणे, आम्ही निखळ आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी तसेच आईस्क्रीमच्या परिपूर्ण स्वादामध्ये गुंतण्याची रोमहर्षकता मिळून मिसळून अनुभवण्यासाठी एक रोमांचक प्रवास सुरू करतो.

भारतीय अभिनेत्री आणि एनआयसी आईसक्रीम्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर रश्मिका मंदान्ना याप्रसंगी आपला आनंद व्यक्त करताना म्हणाली, एनआयसी आईसक्रीम्सशी नाते जोडले गेल्याने मी अतिशय आनंदी आहे! ब्रँडची शुद्धता आणि प्रामाणिकपणाचे अंतरंग असलेल्या फ्लेवर्सची वचनबद्धता माझ्या वैयक्तिक मूल्यांना अतिशय खोलवर साद घालतात. इतर असंख्य ग्राहकांप्रमाणेच माझे आईस्क्रीमवरचे प्रेम लहान वयातच सुरू झाले. एनआयसीसोबतच्या या सहयोगाची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि या आइस्क्रीमचा आनंद सर्वांना प्रदान करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading