अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सहकार नगर शाखेच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवा शिबिर
पुणे : वारकऱ्याची केलेली सेवा विठ्ठलाच्या चरणी पोहोचते असे म्हणतात.सहकारनगर शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यात आलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आले.
महसंघातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ अर्चना जोशी, डॉ सोहम जोशी यांच्या नेतृत्वात झालेल्या शिबिरात अंगदुखी,ताप , सर्दी, अशक्तपणा,जुलाब उलटी असिडीटी या आजाराची औषधे तसेच वेदनाशामक तेल व मलम वारकऱ्यांना देण्यात आले.ब्लडप्रेशर तपासणी, विविध आजारांवर मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला यातच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान कार्यक्रमाच्या यशाचे गणित सांगून गेले.या शिबिरात ३५०ते४०० वारकरी सहभागी होते.दिंडीमधील वारकऱ्यांना इमर्जन्सी लॅंप , नॅपकीन्स, बिस्कीट पुढे देण्यात आले., पुण्यात बाजीराव रोड येथे झालेल्या या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाआरोग्य शिबिरात मंदार रेडे , सौ.केतकी कुलकर्णी,सौ. जयश्री घाटे,गुंता देशमुख, वृषाली पूरकर,स्वप्ना क्षीरसागर, श्वेता भगत,ऋता वर्दे, स्मिता इनामदार, प्रदीप रत्नपारखे , स्वप्निल अदमाने,उमेश धडफळे, उपस्थित होते.दिंडीप्रमुख अण्णा पाटील व संभूस गुरुजी यांनी शिबिराची व्यवस्था केली होती व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आभार मानले.
