Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

सनी लिओनीचा ” केनेडी ” सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार ! 

जिच्या फॅशन ने कान्स फेस्टिवल मध्ये अभूतपूर्व यश आणि कौतुक मिळवलं अशी अभिनेत्री सनी लिओनी ! सनी
दरवर्षी विविध भूमिका साकारत असते जगभरात तिच्या कामाच्या चर्चा होत असताना ती तिचा आगामी चित्रपट केनेडी आता सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये जाऊन पोहचला आहे. केनेडी मध्ये  सनी चार्लीची भूमिका करत आहे जी भूमिका नक्कीच कमालीची आहे.
या चित्रपटाची नुकतीच आदरणीय ज्युरींनी कान्स चित्रपट महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंगसाठी निवड केली होती. मध्यरात्रीच्या प्रदर्शनासाठी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने सात मिनिटांची स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळवला. सनी लिओनीच्या चार्लीमध्ये केलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. कान्स पर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट  सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला जाणार आहे. सिडनी फिल्म फेस्टीवल १४ आणि १७ जून रोजी होणार आहे.
सिडनी फिल्म फेस्टिव्हलबद्दल अधिक बोलताना सनी सांगते ” कान्स फिल्म फेस्टिव्हल खूप यशस्वी ठरला आणि मी य साठी खूप कृतज्ञ आहे. हा चित्रपट आता  सिडनी फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार आहे. अनुराग सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की यासारखा उत्तम चित्रपट मला करायला मिळाला.
केनेडीचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात राहुल भट्ट सहकलाकार आहेत. केनेडी च्या सोबतीने सनी कडे अजून कमालीचे प्रकल्प आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading