Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोणत्याही नेत्याला धमकी दिलेलं खपवून घेतलं जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार यांना ट्विटर वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याला धमकी दिलेलं खपवून घेतलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना ज्या हँडलवरून धमकी आली त्याची शहानिशा करा आणि कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शरद पवार यांना धमकी मिळाल्याचे उघड झाल्यानंतर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त फडणसळकर यांची भेट घेतली. जवळपास पाऊणतास यांच्यात चर्चा झाली. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांना ज्या हँडलवरून धमकी आली त्याची शहानिशा करा आणि कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, धमकी मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पुण्यातील घरं बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading