Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांसाठी 12 जून पासून पीएमपीएमएलच्या अनुदानित पासेसचे वितरण

पुणे : सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर पासेससाठी दि. १२/०६/२०२३ पासून अर्जाचे वाटप सर्व आगारामधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विदयार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेसकरीताचे अर्ज वितरण दि. १२/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येईल. अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading