Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरस्वती वैद्य हत्या प्रकरण : आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याने …

मुंबई : कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा आशा भयानक पद्धतीने आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य या महिलेचा खून केल्याचे काल उघड झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आज तपासा दरम्यान आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे पोलिस चौकशीत समोर आहे. आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याने सरस्वती आणि मनोज यांच्या नात्यामध्ये तणाव होता. तसेच सरस्वतीने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येचा आळ आपल्यावर येवू नये म्हणून मृतदेहाची आपण विल्हेवाट लावत असल्याचे, आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, आरोपी नराधम मनोज साने याला पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोजने चौकशी दरम्यान अनेक दावे केले आहेत. तसेच तो आपला जबाब वारंवार बदलत आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या प्रत्येक बाबीची चौकशी केली जाणार आहे.

सारस्वती मला मामा म्हणायची 

सरस्वती हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने हा 56 वयाचा आहे. तर सरस्वती ही 32 वर्षांची होती. त्यामुळे ती तिच्या इतर नातेवाईकांना मामाकडे राहते असे सांगायची. आरोपीनेही हाच दावा केला आहे. मनोज आणि सरस्वतीची ओळख एका रेशच्या दुकानात त्यांची ओळख झाली. त्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून ते लिव्हइनमध्ये राहत होते. दरम्यान, सरस्वती अहमदनगरमध्ये लहानाची मोठी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading