Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माझ्या आधी फडणवीसांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्या – प्रकाश आंबेडकर

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयोगाला एक पत्रच पाठवले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, जानेवारी 2018 साली कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील 5 जून ला साक्ष नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकत नसल्याचे आयोगाला कळवले आहे. तसेच आपली साक्ष नोंदवण्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी मिळावी, अशा मागणीचे पत्र देखील त्यांनी पाठवले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading