Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

साईनाथ मंडळ ट्रस्ट, विधायक मित्र मंडळ व राष्ट्रीय साततोटी हौद मंडळाचा शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा…!

पुणे : भव्य दिव्य अशी शिवराज्याभिषेक प्रतिमा असलेली प्रतिकृतीची रांगोळी व दिपोत्सव करून विद्यार्थ्यांनी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला.

साईनाथ मंडळ ट्रस्ट, विधायक मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कसबा पेठ येथील श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ याठिकाणी ३५० वा शिवराजाभिषेक दिन साजरा करण्यात आला. कसबा संस्कार वर्गातील ७५ विद्यार्थ्यांनी याप्रसंगी भव्य रांगोळी काढून, त्यासभोवताली दिवे लावण्यात आले.

तसेच याप्रसंगी इतिहास संशोधक श्री. अनिकेत यादव यांनी शिवराजाभिषेक करण्याचे कारण, त्याचे महत्त्व आणि त्यातून झालेले परिणाम यांबाबत मुलांशी संवाद साधला. शिवाजी महाराजांचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर त्यांनी सुरू केलेला शिवशक आपण दैनंदिन व्यवहारात वापरला पाहिजे. त्यासाठी आपण जेथे कुठे तारीख लिहीत असू तेथे शिवशक ३५० असे लिहीण्याबाबत त्यांनी सांगितले.

सर्वांकडून सामूहिक शिववंदना सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन साईनाथ मंडळ ट्रस्ट चे पियुष शाह, नरेंद्र व्यास कसबा संस्कार वर्गाचे अनिल दिवाणजी, राष्ट्रीय साथतोटी हौद मंडळाचे स्वप्नील दळवी, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, व अभिषेक पाठक, संदीप लचके, अनघा दिवाणजी यांनी केले होते. सुषमा पोटे यांच्या रांगोळी कलेतून रांगोळी साकारण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading