Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

करिश्मा तन्ना ने ‘स्कूप’ मधून जिंकली प्रेक्षकांची मने !

विविध भूमिका मधून अभिनेत्री करिश्मा तन्‍ना ने प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन केलं आहे. मनोरंजन विश्वातला तिचा प्रवास नेहमीच उल्लेखनीय ठरला आहे. प्रत्येक भूमिका चोख पार पाडून ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तिच्या अष्टपैलुत्व व्यक्तिमत्वाने तिने आता पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नेटफ्लिक्स वर नुकतंच रिलीज झालेल्या तिच्या नव्या कोऱ्या “स्कूप” या वेब सीरिज मधून तिच्या अभिनयाची अनोखी झलक बघायला मिळतेय.

एका चाहत्याने खास टिप्पणी करत लिहिलंय करिश्मा तन्ना चा नवा अभिनय नक्कीच अफलातून आहे. ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तर सगळ्यांना माहीत आहे. या सीरिज मधली जागृती प्रेक्षकांना आपलंसं करून घेते आणि म्हणून ही सीरिज बघायला विसरू नका !

दुसर्‍या एका चाहत्याने टिप्पणी केली ही सीरिज नक्कीच ब्लॉकबस्टर दिसत आहे. जागृती पाठक म्हणून करिश्मा तन्ना ची भूमिका नक्कीच कमालीची आहे.जागृती पाठकची तिची भूमिका गेम चेंजर आहे.

“स्कूप” मधल्या करिश्मा तन्ना च्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. सोशल मीडिया वर या सीरिज च्या चर्चा सुरू आहेत. उत्कृष्ट कथाकथन आणि दिग्दर्शनाद्वारे समर्थित तिची आकर्षक कामगिरी तिला इंडस्ट्रीमध्ये एक जबरदस्त अभिनेत्री ही ओळख देऊन जाते. ओटीटी क्षेत्रातील कलाकारांना अनोखी टक्कर देत करिश्मा आपल्या कामाचा करिश्मा असाच सुरू ठेवणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading