साई मंदिर आळंदी रोड रौप्यमहोत्सवी वर्षानिममित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन
पुणे : ४ जुन १९९८ रोजी श्री साई सेवा प्रतिष्ठान , च्या वतीने श्री साईबाबा देवस्थानची स्थापना वडमुखवाडी ,आळंदी रोड पुणे येथे करण्यात आली .अल्पावधीच लाखो साईभक्तांचे श्रधास्थान म्हणून हे साई देवस्थान प्रसिद्ध झाले . २५ वर्ष पुर्ण झाल्याने रौपहमहोत्सव साजरा करण्याचे श्री साई सेवा प्रतिष्ठान यांनी ठरविले आहे.
उद्या ४ जुन रोजी श्री साई देवस्थान वडमुखवाडी येथे दुपारी १२ वाजता महापूजा व महाआरतीचे तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे . याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,पद्मश्री गिरीश प्रभुणे तसेच सामाजिक ,राजकिय ,सांस्कृतिक,वारकरी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित रहाणार आहेत . सदर महाआरती व महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी केले आहे .
