Thursday, June 4, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; 50 जणांचा मृत्यू तर 350 हून अधिक जखमी

नवी दिल्ली : ओडिसामध्ये ट्रेनचा मोठा अपघात झाला आहे. बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची आज (2 जून) समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेनचे 4 डबे रेल्वे बाऊंड्रीच्याही बाहेर गेले. तब्बल 15 डबे रुळावरून घसरले, तर 7 डबे उलटले. या अपघातात 50 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 350 प्रवाशी हे जखमी झाले आहे. (Coromandel Express collides with freight train; 50 dead and over 350 injured)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस (12841)पश्चिम बंगालच्या शालिमार स्टेशनहून चेन्नईसाठी निघाली होती. बालासोरला संध्याकाळी 6.30 वाजता ही ट्रेन पोहोचली. कोरोमंडल एक्स्प्रेस ज्या रेल्वे ट्रॅकवर होती त्याच रेल्वे ट्रॅकवर समोरून मालगाडी आली अन् दोन्ही रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक झाली. दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा रेल्वे अपघात इतका भयानक होता की शेकडो प्रवाशी जखमी झाले आहेत व अनेक जण डब्यांमध्ये आडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शोध आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि ODRAF च्या अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी अनेक डबे रुळावरून घसरल्याची माहिती सीपीआरओ दक्षिण रेल्वेने दिली. जिल्हाधिकारी, बालासोर यांना देखील सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि राज्य स्तरावरून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास SRC ला कळवावे, असे विशेष मदत आयुक्त कार्यालयाने सांगितले.

ओडिशा सरकारने सांगितले की, “आम्ही घटनास्थळी 15 रुग्णवाहिका पाठवल्या आहेत आणि रुग्णांना सोरो सीएचसीमध्ये हलवण्यास सुरुवात झाली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की काहींना उच्च सुविधांमध्ये पाठवले जाईल.” बालासोरमधील नियंत्रण कक्षाचा आपत्कालीन क्रमांक आहे- 06782262286

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading