दहावीच्या परीक्षेत जाधवर माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
पुणे : न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्च्या अॅड.शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रा.डॉ. सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५ टक्के लागला आहे. तर, पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजचा निकाल ९६.६३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गुणवत्तेकडे लक्ष देऊन अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
अॅड.शार्दुल सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा शिवम सावंत हा ९२.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. अनुष्का कंधारे ९०.८० टक्के गुण मिळवून द्वितीय तर नंदिनी चौधरी हिला ९०.४० टक्के मिळाले असून तिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाची नम्रता येंडोले ही ८७.२० टक्के मिळवून प्रथम, शिवम जगताप ८६.४० टक्के मिळवून द्वितीय व ओंकार केरिपाळे हि ८३.२० टक्के मिळवून तृतीय आला आहे.
तसेच पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिया अंगदकर ८७.२० टक्के मिळवत प्रथम, सोनित सिसोलेकर ८६.६० टक्के द्वितीय व अमरनाथ वाघमारे याला ८६ टक्के गुण मिळाले असून त्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर व उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी विद्यार्थ्यांचे परिश्रम, सुनियोजन, अभ्यास आणि शिक्षकांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाचे यश असल्याचे सांगितले. तसचे यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचेही अभिनंदन केले.
