Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

मी होणार सुपरस्टारच्या  महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ स्पर्धकांना नायिकांची मिळणार साथ

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या मंचावरील बच्चेकंपनीचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट आणि ट्रायो असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर सादर झाले. प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ३ आणि ४ जूनला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. जळगावचा सागर आणि दिव्येश, कल्याणचा झीरो डिग्री क्रू ग्रुप, कराडचा डी टू डी क्वीन्स ग्रुप, पुण्याची श्रीमयी सूर्यवंशी आणि पिंपरीच्या सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची साथ मिळणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, रंग माझा वेगळाची दीपा, शुभविवाह मालिकेतली भूमी, लग्नाची बेडीमधील सिंधू आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत.

सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, सई-शरयू आणि श्रीमयी सूर्यवंशी या स्पर्धकांमधून अंतिम विजेता कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टॉप ५ स्पर्धकांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार अनुभवायचा असेल तर पहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ३ आणि ४ जूनला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहव

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading